शुद्ध हवेसाठी नवचंडी यज्ञ

|

                          शुद्ध हवेसाठी नवचंडी यज्ञ

लेखक: वैद्य विजय कुलकर्णी

नाशिक

मो.९८२२०७५०२१

          नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध सार्वजनिक मंडळाच्या वतीने नवचंडी नावाच्या यज्ञाचे आयोजन केले जाते. यामध्ये विविध यज्ञ कुंड तयार करून त्यामध्ये अग्नीचे सन्दुक्षन केले जाते. व्यवहारात याला होम-हवन असेही म्हणतात. सध्याच्या प्रदूषण काळात अशा प्रकारच्या यज्ञाची उपयुक्तता आहे. वाढत्या शहरीकरणामुळे वाहनाची संख्या वाढत चालली आहे या व अन्य काही कारणामुळे हवेचे प्रचंड प्रदूषण होत आहे. त्याचप्रमाणे दासंसारखे (मच्छर) उपद्रवी घटक मनुष्य प्राण्याला घातक ठरत आहे. हवा अशुद्ध झाल्याने मलेरिया, डेंग्यू आणि आता स्वाइन फ्लू असे विविध व्याधी डोके वर काढत आहे. आयुर्वेद शाश्त्राने हवेच्या शुद्धी साठी विविध प्रकारची धूपनचिकित्सा सांगितली आहे. यज्ञ किंवा होम-हवन हा याचाच एक महत्वपूर्ण भाग समजला पाहिजे.

नवरात्रातील नवचंडी यज्ञ योग्य रीतीने केला तर त्यामुळे निर्माण होणाऱ्या धुराचा त्रास न होता उलट त्यामुळे त्याठिकाणची आणि भोवतालची हवा शुद्ध राहू शकते. अशा प्रकारच्या यज्ञा मध्ये अग्नीचे सन्दुक्षन व्हावे यासाठी साजूक तुपाची आहुती त्यामध्ये दिली जाते. अर्थात हे तुप यज्ञा साठी प्रातिनिधिक स्वरुपात वापरले गेले असावे कारण खरेतर या साजूक तुपाचा उपयोग आपल्या शरीरातील अग्नीवर्धनासाठी होतो. हे लक्षात घेऊन आपल्या आहारात त्याचा योग्य प्रमाणात समावेश करायला हवा सध्याच्या काळात आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल वाढेल या चुकीच्या समजामुळे अनेकजण गायीचे साजूक तुप हि खात नाही विशेष करून महिला वर्ग देखील साजूक तुपामुळे वजन वाढेल या वृथा भीतीपोटी साजूक तुपापासून स्वताला दूर ठेवतात. आणि त्याच्या गुणांपासून त्या वंचित राहतात. तेव्हा नवचंडी यज्ञाच्या निमित्ताने आपण गायीच्या तुपाचे असलेले आरोग्यदायी महत्त्व समजून घेतले पाहिजे. आणि सध्याच्या काळात अतिशय गरजेचे असलेले हवेचे शुद्धीकरण करण्यासाठी अशाप्रकारच्या विविध यज्ञाचे आयोजन केले पाहिजे असे वाटते.