नवरात्रातील उपवास करताना

|

                  नवरात्रातील  उपवास करताना

                                                        वैद्य विजय कुलकर्णी

                                                                         नाशिक

                                                                       9822075021

          नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दुर्गा पुजा हि मनोभावे केली जाते. दुर्गादेवी बद्दल भक्तीभाव प्रकट करण्यासाठी अनेकजण, त्यातही विशेष करून महिलावर्ग संपूर्ण नऊ दिवस उपवास करताना दिसतात आपल्या मनावर नीट ताबा राहावा आणि संयम राखलाजावा या हेतूने खरेतर उपवासाची परंपरा आपल्याकडे सुरु झाली असावी. संयमाबरोबर च मर्यादित उपवास केल्यास त्याचा आरोग्यासाठी होणारा उपयोग लक्षात घेऊन त्याला आपल्या पुर्वचर्यानी धर्माची हि जोड दिलेली आपल्याला दिसून येते पण अनेकदा नऊ दिवस केलेला उपवास अनेकांना सहन होत नाही गेल्यावर्षी याच काळात केलेल्या अतिउपवासामुळे काही महिलांना त्रास झाला होता हे अनेकांना आठवत असेल हे लक्षात घेऊन उपवास कोणी करावा, किती काळ करावा, उपवास काळात काय खावे, काय प्यावे यासंबधी आरोग्याच्या दृष्टीने या लेखात उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे.

उपवास कोणी करावा ?

प्रत्येकाला उपवास सहन होतो असे नाही ज्याची प्रकृती पित्त किंवा वाताची असेल, किंवा ज्यांना भूक अजिबात सहन होत नाही, तसेच ज्यांना महुमेह, ह्द्यरोग, रक्तदाब कमी होणे. वजन कमी असणे अशाप्रकारचे विकार असतील त्यांनी उपवास करताना अतिशय काळजी घ्यावी किंवा तो तळ्यास उत्तम अशा व्यक्तीने संपुर्ण नऊ दिवस कधीही उपवास करू नये.

ज्यांची प्रकृती कफदोष प्रधान आहे, ज्यांना भूक सहन होऊ शकते अशा व्यक्तींनी मर्यादित प्रमाणात उपवास करावा. अतिप्रमाणात आणि दीर्घकाळ उपवास करणे हे आरोग्याला घातक ठरू शकते ते प्रत्येकाने लक्षात घ्यावे.

उपवास म्हणजे हलके खाणे

आरोग्यदायी उपवास करणे म्हणजे त्या काळात उपचायला हलके असे अन्नपदार्थ घेणे.

त्यामध्ये राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की, गायीचे दुध, डाळींब, पपई अशी पचायला हलकी फळे, कोमट पाणी इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. साबुदाणा, रताळी, बटाटे, शेंगदाणे असे पदार्थ पचायला जड आहेत त्यामुळे आरोग्यासाठी ते उपयुक्त नाही. त्यामुळे उपवासासाठी नेहमी हलके भोजन घ्यावे हे नक्की.