आरोग्यदेवता श्री धन्वंतरीकडे करुया आरोग्याचे मागणे...

|

आरोग्यदेवता श्री धन्वंतरीकडे करुया आरोग्याचे मागणे...

वैद्य-विजय कुलकर्णी (नशिक)

मो.९८२२०७५०२१

श्री. धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशी) हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून दर वर्षी देशभर पाळण्याचे केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने निश्चित केले आहे. यंदाचे वर्षी मंगळवार दिनांक २ नोव्हेंबर २०२१ रोजी हि जयंती असून त्यानिमिताने हा विशेष लेख...

दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाची आद्य देवता मानल्या गेलेल्या श्री धन्वंतरीचे पूजन केले जाते. या दिवशी श्री धन्वंतरिची जयंती साजरी करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षापासून आहे या दिवशी केले जाणारे धन्वंतरीचे पूजन हे खरे तर प्रतिकात्मक असते. यानिमित्ताने या देवतेचे स्मरण करून त्याच्या हातामध्ये असलेल्या शंख, चक्र, जलौका (जळू) आणि अमृतघट यांचा उपयोग जनकल्याणासाठी आणि जणस्वास्थ्यासाठी व्हावा हा संदेश यानिमिताने सगळ्यांना मिळावा ही यामागची मूळ संकल्पना असावी.

सध्याची आरोग्याची स्थिती चिंताजनक :

आजच्या सामाजिक आरोग्याचा आढावा या धन्वांतीच्या पूजनाच्या निमित्ताने द्यायचा झाला तर अतिशय चिंताजनक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहाते . मधुमेह , उच्च रक्तदाब, दमा, कॅन्सर, या विकारांचे वाढते प्रमाण सामाजिक अस्वास्थ्य निर्माण करत आहे. एकट्या क्षयरोगाने मरण पावनार्यांची संख्याही एक चिंतेचा विषय बनली आहे. नवनवीन वैद्यकीय शोध लागत असले , नवीन नैदानिक तंत्रज्ञान विकसित होत असले , नवीन औषधांचा जन्म होत असला तरी दुसरीकडे मात्र समाजाचे स्वास्थ्य उत्तम असल्याचेदिसत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. वर उल्लेखलेल्या काही मोठ्या विकारानबरोबर पोटाचे विकार आम्लपित्त, जुनाट सर्दी, संधीवात, शीतपित्त, डोकेदुखी, इसबासारखे त्वचेचे अनेक विकार, मलावरोध आश शारीरिक तक्रारींचे प्रमाणही प्रचंड आहे. त्याचबरोबर स्त्रियांचे विकार, लहान मुलांचे विकार, वृद्ध लोकांच्या तक्रारी यांचेही वाढते प्रमाण एकूण चिंताजनकच आहे.

पाछात्य वैद्यकपद्धतीनुसार पूर्वीची प्रतिजैविक आता बर्याच प्रमाणात अकार्यक्षम झाली आहेत अथवा जीवाणूंचा नाश करण्यासाठी नवीन महागड्या प्रतीजैविकांवर अवलंबून रहावे लागत आहे. माणसाची प्रतिकार शक्ती वाढण्याऐवजी त्याच्यावर आक्रमण करणाऱ्या जीवाणूंची प्रतिकार शक्ती वाढली आहे. त्याचमुळे पूर्वीच्या प्रतीजैविकांना ते दाद देईनासे झाले आहेत.

याची कारणे शोधणे हे आजमितीला आवश्यक बनले आहे. आजच्या बिघडत्या आरोग्यस्थितीची कारणे नीट बघायला गेले तर आपल्यालाही असे दिसेल की, आरोग्याकडे बघण्याचा जनसामान्यांचा दृष्टिकोन हा अज्ञान आणि दुर्लक्ष या दुरगुनानी युक्त असा आहे: आपण काहीही खाल्ले, काहीही प्यायले तरी आपल्याला काहीही होणार नाही या भ्रामक समजुतीत बहुतांशी समाज असल्याने आरोग्याचे बरेचसे प्रश्न निर्माण झाले आहे आणि होतही आहेत. समाजात पुरेसे आरोग्य शिक्षण नसल्यानेही बरेच आरोग्यचे प्रश्न उभे राहिले आहेत. दूरदर्शनवरील किवा अन्य प्रसारमाध्यमांवरील जाहीरातीना भुलून लहान मुलांपासून थोरांपर्यंत बरेच जण फास्ट फूड च्या नादी लागले आहेत. आम्ही लिंबाचे सरबत संत्र्याचा, मोसंबीचा रस विसरून कुत्रिम शीतपेयांकडे वळतो आहोत. आमचा रोजचा दिनक्रम अत्यंत अनियमित बनत चालला आहे. वेळेवर झोपही नाही केव्हाही न्याहारी, काहीही खायचे, केव्हाही न्याहारी , कितीही पाणी प्यायचे, केव्हाही उपवास करायचा, रात्री दही खायचे, दुपारी झोपायचे टी.व्ही. समोर बसून जेवायचे. लक्ष टी.व्ही.तल्या मालिकेत, जेवणात नाही. असा सगळा बिघडलेला दिनक्रम हे आपले बिघडत जाणारया आरोग्याचे मोठे कारण आहे ऋतू बदलले तरी खाण्यापिण्यात बदल न कारणे , ऋतूला अनुसरून आहार न घेता भलतेच काहीतरी खात-पीत राहणे यानेही आपली प्रकृती बिघडते पण लक्षात कोण घेतो? धन्वंतरीकडे मागण :

आरोग्याची बिघडलेली स्थिती आणि तिची कारणे श्री धन्वंतरी जयंतीच्या जयंतीच्या निमित्ताने डोळ्यासमोर ठेवली तर श्री धन्वंतरीला तिच्या पूजनाच्या प्रसंगी लोकांना आरोग्याचे शिक्षण मुळे दे... ते आरोग्य शिक्षण देण्याची सबुद्धी व्यावसायिकांना दे.. आणि लोकांनाही आपले आरोग्य चांगले राहावे अशा जाणीवा त्यांच्या मनात निर्माण होऊ दे... केवळ औषधे खाल्ले की मगच आपला रोग बारा होतो असे नसून, रोग होऊच नये म्हणून प्रतिबंधक उपाय समजून घेण्याची बुद्धीही या जनताजनार्धनामध्ये निर्माण होऊ दे, असे मागणे आपण सार्वजन मिळवून मागू या...

श्री धन्वंतरीच्या हातात शंख, जळू, या उपयुक्त गोष्टी आहेत. शंखाचा उपयोग भस्म स्वरूपात पचन संस्थेच्या अनेक विकारांवर होतो. तर जळू ही रक्त पिपासू असल्याने त्वचेच्या विकारांमध्ये तसेच मूळव्याधी मधेही अशुद्धरक्त शोषून घेण्यासाठी तिचा उपयोग होतो. अमृतघटाचा सामावेश म्हणजेच निरोगी दिर्घायुशाची जणू काही व्यवस्था असा अर्थ केल्यास वावगे ठरू नये. या प्रातिनिधिक आयुधांचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी आहे. हे समजून घेतले तर श्री धन्वंतरी पूजनाचे सार्थक होईल.