मध आणि गरम पाणी एकत्र घेणे आरोग्याला घातक

|

                मध आणि गरम पाणी एकत्र घेणे आरोग्याला घातक....
आरोग्य चिंतन वैद्य विजय कुलकर्णी आयुर्वेद चिकित्सक नाशिक
संपादक आरोग्य चिंतन 9822075021
             अनेक जण आपले वजन कमी करण्याच्या हेतूने सकाळी उठल्यावर पोट साफ झाल्यावर एक चमचा मध आणि त्यामध्ये थोडेसे गरम पाणी असे मिश्रण घेतात .खरे तर हे सर्व गैरसमजापोटी घेतले जाते .आरोग्याच्या दृष्टीने मध आणि गरम पाणी हे मिश्रण आरोग्याला घातक आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे मुळात मध आणि गरम पाणी एकत्र येऊ नये मध हा गरम ऋतूत म्हणजेच एप्रिल मे महिन्यामध्ये तसेच ऑक्टोबर हिट मध्ये जास्त सेवन करू नये तसेच मध गरम करू नये अशा काही गोष्टी मधाच्या सेवना बाबतीत आयुर्वेदशास्त्राने सर्वांसाठी सांगितल्या आहेत .मध आणि साधे पाणी हे मिश्रण मात्र आपले वजन कमी करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकते हे सर्व स्वतःचे स्वतः न करता योग्य वैद्यांचे सल्ल्याने केल्यास आरोग्यासाठी ते मार्गदर्शक ठरू शकते. अनेकजण मध गरम पाणी आणि लिंबू असे मिश्रण सकाळच्या वेळी घेत असतात. त्यांनाही मध आणि गरम पाण्याचे मिश्रण हे घातक ठरू शकते हे लक्षात घ्यावे या जाडेपणा कमी करण्यासाठी इतरही योग्य ते उपचार योग्य मार्गदर्शनाखाली करून घ्यावे लागतात .
(या आणि अशा अनेक माहिती साठी आरोग्य चिंतन हे मासिक जरूर वाचा वार्षिक वर्गणी केवळ रुपये दोनशे पन्नास फोन पे किंवा गुगल पे करा 9822075021 आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
www.arogyachintan.in )