आयुर्वेदातील शरीरशुद्धी

|

आयुर्वेदातील शरीरशुद्धी

लेखक वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक)

मो. ९८२२०७५०२१

आपल्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ हे तीन दोष असतात. ते समस्तित्त असले तर शरीर निरोगी राहते. परंतु त्या पैकी एक, दोन किवा तिन्ही दोष वाढले तर मात्र शरीराचे आरोग्य बिघडते आणि आपले शरीर व्यादिग्रस्त् होते. अशा वेळी दोन प्रकाराने आयुर्वेदात चिकित्सा केली जाते. १.शोधन चिकित्सा २.शमन चिकित्सा.

शोधन चिकित्से मध्ये शरीरात वाढलेले दोष शरीरा बाहेर कडून टाकणे म्हणजे शोधन होय. हि एक शरीराची शुद्धी प्रक्रिया आहे.

शमन चिकित्सेमध्ये रुग्णाला आयुर्वेदातील काही औषधे देऊन वाढलेल्या दोषाचे शमन केले जाते.

आयुर्वेदात शरीर शुद्धीसाठी विविध उपक्रम केले जातात.

वाट दोष वाढल्यास बस्ती हा विधी केला जातो.

पित्त दोष वाढल्यास विरेचन हा शोधन उपक्रम करतात.

कफ दोष वाढल्यास वमन हा उपक्रम केला जातो.

रक्तधातू दुष्ट झाल्यास त्याचे शोधन करण्यासाठी रक्त मोक्षण केले जाते.

शिरोभागातील दोष बाहेर काढण्यासाठी नस्य हा उपक्रम केला जातो त्याला शिरोविरेचन असे म्हणतात

वातदोषावर बस्ती .

या मध्ये तेल, काढा किवा अन्य द्रव पदार्थ रुग्णाच्या शरीरात गुद मार्गातून आत सोडले जातात.

निरूह बस्ती आणि अनुवासन बस्ती असे बस्तीचे दोन मुख्य प्रकार आहेत.

निरूह बस्तीसाठी विविध औषधी द्रव्याचे काढे वापरतात.

अनुवासन बस्ती मध्ये तेलाचा उपयोग केला जातो.

बस्ती देण्यापूर्वी रुग्णाचा पाठीला आणि पोटाला थोडेसे तेल लाऊन शेख दिला जातो.

बस्ती दिल्यानंतर थोड्या वेळ विश्रांती घ्यावी लागते.

बस्तीचे उपयोग

वाताचा अनेक तक्रारींवर बस्तीचा उपयोग होतो उदा. संधीवात, कंबरदुखी, मानदुखी, गुदगेदुखी, आमवात, डोकेदुखी, पोटसाफ न होणे, पक्षवध इत्यादी.

बस्तीचा उपयोग रोग प्रतिकार बांधासाठी होतो.

ज्यांना काही त्रास नाही अशांनी वर्ष ऋतूत म्हणजे पावसाळ्यात सुरवातीला बस्ती घ्यावा.

पित्तासाठी विरेचन

विरेचन हि पित्तदोषावरील उत्तम चिकित्सा आहे.

त्याने रोगाचा प्रतिबद्ध होतो आणि रोग झाल्यावर त्याचा प्रतिकार हि होतो.

पित्तदोषाचा प्रतिबंध होण्यासाठी शरद ऋतुमध्ये म्हणजे ऑक्टोंबर महिन्यात विरेचन घेता येते.

या मध्ये जुलाब होण्यासाठी औषध देले जाते.

त्यासाठी एरंडेलतेल, अभ्यादी मोदक इत्यादी औषधे वापरली जातात.

विरेचन देण्यापूर्वी तीन किवा पाच किवा सात दिवस औषधी तूप खायला देतात.

विरेचन देल्यानतर हळूहळू आहार वाढवावा लागतो.

विरेचनाचे उपयोग

अनेक पित्तजन्य व्याधीनवर विरेचन उपयोगी पडते.

उदा. आम्लपित्त, हातापायाची जळजळ होणे, पित्तामुळे होणारी डोकेदुखी, डोळे लाल होणे, मलावरोध, त्वचेचे रोग, शित्पित्त, ईसब इत्यादी.

कफ दोषावर वमन

या उपक्रमात उलटीचे औषध देऊन कफ शरीर बाहेर काढला जातो.

कफ रोगाचा प्रतीबंदासाठी वमन द्यायचे झाल्यास ते हिवाळा संपल्यावर वसंत ऋतूचा सुरवातीला देले जाते.

वमन देण्यापूर्वी विरेचन विधी प्रमाणे तीन, पाच किवा सात दिवस औषधी तूप देले जाते.

वमन होण्यासाठी जेष्ठमधाचा काढा, उसाचारस, मदनफल चूर्ण, दुध इत्यादीचा उपयोग केला जातो.

वमनपूर्ण झाल्यावर हळूहळू आहार वाढवला जातो.

वमानाचे उपयोग

जुनाट सर्दीपडसे, खोकला, दमा, फुफुसाचे काही रोग, आम्लपित्त, त्वचेचे रोग, शरीराचा खालील भागातील रक्तपित्त अशा अनेक रोगानवर वमानाचा उपयोग होतो.

रक्तमोक्षण

या मध्ये शरीरातील दुषितरक्त काही प्रमाणात बाहेर काढून टाकले जाते.

त्या साठी सुई तसेच सिरीजचा उपयोग केला जातो.

रक्त मोक्षण करण्यापूर्वी औषधी तूप दिले जाते.

रोगाचा प्रतिबंधासाठी शरद ऋतुमध्ये रक्त मोक्ष्ण करतात.

रक्तमोक्ष्णाचे उपयोग

रक्त दुष्टीचा अनेक विकारात हे उपयोगी पडते.

उदा. तोंडयेणे, डोळ्याचे काही रोग, रक्त्प्रदर, रक्तपित्त, गळू होणे, वात रक्त, अग गरम असणे, त्वचेचे रोग, आबट ढेकर येणे इत्यादी.

नस्य

या मध्ये नाकार औषधी तेलाचे थेब टाकले जातात.

नाक हे डोक्याचे दार समजले जाते. त्यामुळे डोक्याचा अनेक विकारामध्ये त्याचा उपयोग होतो.

नस्य करण्यापूर्वी कपाळ, गाल, मान, गळा आणि पाठीचा काही भाग याला तेल लाऊन शेख दिला जातो.

नसस्याचे उपयोग

न्स्स्याचे उपयोग विविध शिरोरोग, जुनाट सर्दी, केस गळणे, केस पाढरे होणे, मानदुखी, खादेदुखी इत्यादी मध्ये होतो.