आरोग्यदायी तिळगुळ

    Date : 13-Jan-2022
|

आरोग्यदायी तीळगुळ

लेखक :- वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक)

मो. ९८२२०७५०२१

१४ जानेवारी रोजी मकर संक्रांत . त्या निमित्ताने तिळगुळाचे आरोग्यासाठे चे महत्व सांगणारा हा लेख.......... मकर संक्रांत हा सण हिवाळ्यामध्ये येतो. यावेळेला वातावरण हे थंड, उबदार असते. संक्रांतीच्या दिवशी केली जाणारी गुळाची पोळी आणि तिळगूळ हे शरीरात उष्णता निर्माण करतात आणि हे पदार्थ शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने हितावहच ठरतात यात शंका नाही.

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने या दिवशी तीळ आणि गुळाचा आपल्या शरीराला होणारा उपयोग समजून घेणे हे निश्चितपणे उचित ठरेल असे वाटते.

तिळाचे उपयोग

तीळ आणि गुळ यांचा एकत्रित विचार करण्याआधी त्यांचा स्वतंत्रपणे विचार केला आहे. आपल्या रोजच्या स्वयंपाकातही आपण या दोन्ही पदार्थांचा थोडया प्रमाणात उपयोग करतो. तीळ हे प्रामुख्याने काळे व पांढरे असे दोन प्रकारचे असतात. त्यांपैकी काळे तील हे श्रेष्ट माने जातात. आयुर्वेदीय ग्रंथांमधून तिळाचा उल्लेख विपुल प्रमाणात सापडतो.

तीळ हे गुणाने उष्ण आहेत. तीळामध्ये स्निग्धता बऱ्याच प्रमाणात असते. तीळ हे पचायला जड असतात. होमहवनासाठीही तिळाचा उपयोग केला जातो.

रक्ती मुळव्याधीवर तीळ आणि समप्रमाणात लोणी यांचा उत्तम उपयोग होतो. तिळाने वातशमनाचे कार्य चांगल्या प्रकारे होते. १०० ग्राम तीळामध्ये १०.५ मि.ग्र. लोह असते. मातेच्या दुधाचे प्रमाण वाढण्यासाठी तीळ दुधात वाटून दिल्यास लाभ होतो. मूत्ररोधावर तिळाचा क्षार दह्याच्या निवलीतून दिल्यास उत्तम उपयोग होतो. रोज तीळ चावून खाण्याने दात हे बळकट होतात, शरीर पुष्ट होते. तिळाची केलीली चटणीदेखील रुचकर आणि भूक वाढवनारी अशी असते.

तीळापासून काढलेल्या तेलाचेही अनेक उपयोग होतात. हे तेल केशवर्धन आणि त्यांचे पोषण नीट होण्यासाठी उपयोगी पडते. शरीराला याचे मालीश केल्यास स्नायुंना बळकटी येते, त्वचेला कांती येते.

हे तेल उष्ण असल्याने हिवाळ्यात त्याचे मालीश अंगाला करणे अधिक फायद्याचे ठरते. त्यामुळे त्वचा सिघ्न राहते. सर्व तेलांमध्ये तीळापासून तायार केलेले तेल औषधी गुणधर्मदृष्ट्या श्रेष्ट आहे. यात तिळमात्र शंका नाही.

कांतीच्या सौंदर्यासाठी

शरीरावर होणाऱ्या निरनिराळ्या जखमानवर हे तेल लावल्यास त्यां जखमा लवकर भरून येण्यास मदत होते. संधीवाताच्या रुग्णामध्ये असणाऱ्या सांधेदुखीवर तेलाचा विशेष लाभ होतो.

या तिळाच्या तेलाचा बस्ती देण्यासाठी उपयोग केला जातो. कृश माणसाला शरीर पुष्ट करण्यासाठी याचा बाह्य उपयोग होतो.

तीळाप्रामाणेच गुळाचेही गुणधर्म आणि उपयोग महत्वाचे आहेत. मर्यादित प्रमाणात सेवन केला जाणारा गुळ आरोग्याला हितकारक असतो.

गुळ हा गुणाने उष्ण आणि पचावयास काहीसा जड असा आहारपदार्थ आहे. गुळ हा दोन प्रकाराने तयार केला जातो. एक म्हणजे उसापासून तयार केलेला आणि दुसरा म्हणजे ताडापासून. यामध्ये ताडापासून केलेला गूळ अधिक उपयोगी असतो. पण सध्या बाजारात मात्र उसापासून तयार केलेला गूळ मिळतो. चवीला गोड असणारा गूळ शरीराची पुष्टी करतो. जुना गूळ पचायाला थोडा हलका, पथ्यकर, भूक वाढावनारा असा असतो.

गुळाचा पाक तयार करून बनवलेली आलेपाकवडी सर्दी पडशावर, खोकल्यावर उत्तम उपयोगी पडते. हिरड्याच्या बरोबर गुळ सेवन केल्याने तो पित्तशामक होतो. सुंठ आणि गुळ सेवन केल्यास ते मिश्रण वातशामक होते. यावरून गूळ हा औषधीयदृष्ट्या किती महत्वाचा आहे हे लक्षात येते.

उसापासून तयार केल्या जाणारऱ्या गूळ आणि साखर या दोन पदार्थांमध्ये गूळ हा निश्चितच जास्त आरोग्यदायी असा आहे. उन्हाळ्यात उन्हात फिरून आल्यावर तहान लागलेली असते. त्यासाठी नुसते गार पाणी न देता त्याबरोबरच थोडा गुळ खाण्यास देतात, त्यामुळे गार पाण्याचा त्रास होत नाही. मकर संक्रांतीला गुळाची पोळी तूप लावून खातात. यामुळे शरीरात योग्य ती उष्णता निर्माण होते.

तीळ आणि गूळ एकत्र करून खाल्यास ते शरीराला पुष्टीदायक असे होतात. असा दाखला शोढल या प्राचीन आयुर्वेदीय ग्रंथकाराने दिलेला आढळतो. अर्थात या तिळगुळाचे सेवन मर्यादित प्रमाणात व्हायला हवे हेही तितकेच खरे !