प्रतिकार शक्ती साठी उपयुक्त गुळवेल

23 Jun 2020 11:41:57

                     प्रतिकार शक्तीसाठी उपयुक्त  

                              गुळवेल

                                          लेखक:- वैद्य विजय कुलकर्णी

                                                    नाशिक

                                              मो.बा. ९८२२०७५०२१

 

                   गुळवेल हे नाव आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे. हि वनस्पती वेल स्वरुपात जरीअसली. तरी गुळlशी मात्र तिचा काही संबंध नाही.उलट चवीला ती अत्यंत कडू असते.हिला हिंदीत गीलोय तर संस्कृत मध्ये गुडूची असे म्हणता. हिला गुडूती असेही नाव आहे.याचा अर्थ देहाचे रक्षण करणारी असा आहे. हिला आयुर्वेदाने रसायनी असेही म्हटले आहे. ती अनेक रोगांचा प्रतिकार करते. आपले आयुष वाढवते. आणि अनेक रोगांना प्रतिबंध करते. शरीरातील वात, पित्त ,आणि कप या तीन दोषांचे शमन करते.तर रस,रक्त इत्यादी ७ ध्तुंची पुष्टी करते.धकाधकीच्या जीवनामुळे मानवाची रोगप्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे त्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया, स्वाइंफ्लू, मलेरिया असे तापाचे विविध प्रकार साथीचा स्वरुपात मानवी शरीरावर आक्रमण करतात.

अशा वेळी वैदकिय सल्याने गुळवेल घेतल्यास ती उपयोगी पडते.तिला अमृता असेही नाव श्स्त्रकारणी दिले आहे. याचा अर्थ ती अमृता प्रमाणे उपुक्त असून आयुष वाढवते,गुळवेल हि पचायला हलकी चवीला कडू,तुरट, गुणांनी उष्ण आणि स्निग्ध आहे.कडू चवीची असल्याने ती तापावर उपुक्त आहे. तुपाबरोबर घेतल्यास वाताचे शमन करते. मधातून घेतल्यास कफ कमी करते. आणि साखरे बरोबर घेतल्यास पित्त कमी करते. याचाअर्थ गुळवेल हि वात,पित्त आणि कफ यां तिन्ही दोषानमुळे शरीरात होणाऱ्या रोगांवर उपयोगी पडते.तिचा आणखी एक महत्वाचा उपयोग वातरक्त या व्याधीत होतो. या मध्ये पायाचा अंगठा किवा घोटा सुजतो.तसाच त्याठिकाणी ठणका येऊन वेदना होतात. आधुनिक शास्त्रा नुसार

गाऊट याविकारात अशी लक्षणे दिसतात. रक्तातीत युरीक असीडचे प्रमाण यात वाढते अशावेळीही योग्यसल्याने प्रकुर्ती नुसार गुळवेल घेतल्यास फायदा दिसतो.

               गुळवेल हि आपली प्रतिकार शक्ती वाढवते. त्यामुळे रोग्प्रतीबंधासाठी देखील तिचा उपयौग होतो.आपल्या रक्त वाहिनी मध्ये कफ आणि रक्तयादोन घटकांमुळे विबंध म्हणजे अडथडl निर्माण होतो.त्यावेळी तो दूर करण्यासाठी गुळवेल हे सर्वोत्तम औषध असल्याचे आयौर्वेद सांगतो. हृदयाचा रक्त वाहिनीत असा अडथळl निर्माण होऊन गंभीर हृदय विकार होतो. अशा आडठल्या वरही गुलविलीचा उपयोग करता येतो. गुलवेली पासून विविध औषधे बनवून ती वापरली जातात.गुलवेलचे खोड प्रामुख्याने आयुर्वेदीय चिकित्सेत वापरतात.

गुळवेल सत्व ,गुळवेल काढा, अमृतारिष्ट ,गुळवेल चूर्ण,गुळूवेल सिद्ध तुप, कैशोर गुगुळ हि याची काही उदाहरणे होत.गुळची घनवटी.हे देखील गुळवेलीचे एक प्रसिध्द औषध आहे.अर्थात कोणत्या रोगावर कोणते औषध घ्यावे.यासाठी वैद्यकिय सल्ला आवशक ठरतो.अशा प्रकारे अमृता प्रमाणे उपुक्त असणारी गुळवेल हि निसर्गातील एकमहत्वाची वनस्पती आहे.


गुळवेल _1  H x  

 

Powered By Sangraha 9.0