सध्या उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा सदुपयोग विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्यासाठी करून घ्यावा असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दीलीप म्हैसेकर यांनी एका वेबिनार मध्ये केले. आरोग्य चिंतन मासिकाच्या वतीने चला आरोग्य संपन्न होऊ या या वेबिनार मालिकेतील 26 वे आणि शेवटचे पुष्प गुंफतांना डॉक्टर म्हैसेकर यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की आधुनिक तंत्रज्ञानाचा शरीराच्या आरोग्यासाठी चांगल्या दृष्टीने उपयोग केला तर ते आरोग्याला घातक ठरत नाही . परंतु त्याचा अति वापर किंवा चुकीचा वापर केल्यास मात्र ते आपल्या आरोग्याला हानीकारक ठरू शकते याचे उदाहरण देताना कुलगुरू म्हणाले की की मोबाईल चा अति वापर करणे किंवा गरज नसताना अधिक प्रमाणात त्यावर संभाषण करणे यामुळे आपले डोळे आपले कान तसेच आपले मन यांना इजा पोहोचू शकते आपल्या डोळ्यांवर मोबाईलच्या अतिवापरामुळे अतिरिक्त ताण येऊ शकतो म्हणून काही संशोधनाचा हवाला देऊन डॉक्टर म्हैसेकर यांनी सांगितले की की मोबाईल मध्ये हे 50% पेक्षा कमी बॅटरी असेल तेव्हा त्यामुळे होणारे रेडिएशन वाढीला लागते हे लक्षात घेतले पाहिजे. या वेबिनार चे प्रस्ताविक आरोग्य चिंतांचे संपादक वैद्य विजय कुलकर्णी यांनी केले या वेबिनार मध्ये एकूण 26 जनाची विविध विषयांवर माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्याख्याने झाली या एकूणच वेबिनार च्या यशस्वीतेसाठी आरोग्य चिंतन परिवारातील वैद्य विजय कुलकर्णी श्री रवींद्र अमृतकर श्री मिलिंद आरोलकर सौ योगिता अमृतकर सौ अनिता कुलकर्णी श्रीसागर कुलकर्णी श्री संतोष बैरागी श्री चेतन खंडाळे श्री सौरभ नरसिंगे श्री निलेश छडवेलकर आदींनी परिश्रम घेतले सदर व्याख्यानमालेतील सर्व 26 व्याख्यानांचे व्हिडीओ
www.arogyachintan.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य चिंतन च्या वतीने करण्यात आले आहे.