कोविड तपासणी - समज व गैरसमज

    Date : 28-Sep-2020
|

 

covid_1  H x W:

 Covid-19 च्या तपासण्यां बाबत सर्वसामान्यांचे प्रबोधन करणारा विशेष लेख ऑक्टोबर 2020 च्या आरोग्य चिंतन च्या अंकात प्रकाशित होत आहे श्रीगुरुजी रुग्णालयाचे पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉक्टर गिरीश चाकूरकर यांनी लिहिलेला हा लेख आहे लवकरच ऑक्टोबर चा अंक प्रकाशित करीत आहोत संपादक
या लेखाचा सुरुवातीचा थोडासा भाग वाचकांच्या माहितीसाठी देत आहोत संपूर्ण लेखासाठी ऑक्टोबर चा अंक अवश्य वाचा
 
 
कोविड तपासणी - समज गैरसमज

आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोविड हा अत्यंत संसर्गजन्य आजार असल्यामुळे जगभर पसरला आहे. रोगाची लक्षणे कमी असणारे किंवा नसणारे अनेक रुग्ण आहेत जे वाहकाचे काम करतात. या आजाराचा सामना करताना आजाराचे लवकर निदान करणे ,विलग करणे जवळील संपर्कातील इतरांची तपासणी करणे हे खूप गरजेचे आहे .

कोविड (Corona Virus Disease)या आजाराच्या निदानासाठी सामान्यतः पुढील प्रकारच्या चाचण्यांचे पर्याय उपलब्ध आहेत . . RT-PCR(Reverse Transcriptase Polymerase Chain Reaction) . CB-NAT . Tru-NAT . Rapid Antigen Test

या चाचण्यांच्या वापरासंबंधी ICMR वेळोवेळी दिशा निर्देश देत आहे .सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की ,हा आजार खूप नवा आहे . Corona Virus जरी जुना असला तरी त्यात जनुकीय बदल होत असतात त्यामुळे नवीन आजार होऊ शकतो किंवा आजाराची गंभीरता ,संसर्ग याच्या स्वरूपात बदल होऊ शकतो .