आरोग्यदायी नवरंग

09 Oct 2021 17:04:56

दुर्गा आरोग्यदायीनी भाग : ३

                              आरोग्यदायी नवरंग

लेखक: वैद्य विजय कुलकर्णी

नाशिक

मो. 9822075021

     नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात विशेष करून स्त्री शक्तीमध्ये हा उत्साह ओसंडून वाहत असतो. याचाच एक भाग म्हणून विविध रंगी कपडे त्या परिधान करत असतात आणि देवीलाही त्याच बरोबर सजवत असतात. आपल्याकडे हि स्त्री शक्ती दररोज एका विशिष्ट रंगाची साडी परिधान करत असते. यामुळे नऊ दिवसांच्या नऊ रंगाच्या नऊ साड्या परिधान केल्या जातात. त्याचा क्रमहि ठरलेला असतो. हे नऊ रंग पुढीलप्रमाणे आहेत.

१. पिवळा

हिरवा  

२. राखाडी 

३. केशरी

४. पांढरा

५. लाल

६. निळा

७. गुलाबी

८. जांभळा

     हे नवरंग आपल्या भूवतालाचे एकूण वातावरण बदलून टाकतात. या रंगाच्या छटामुळे आपल्या डोळ्यांना एक प्रकारचे सुख अनुभवायला मिळते. एका विशिष्ट दिवशी सर्वांनी एका विशिष्ट रंगाचे कपडे परिधान केले तर त्यामुळे सामाजिक एकोपा देखील निर्माण होतो आणि या सामाजिक ऐक्यामुळे सर्वांच्या मनाला एक प्रकारची प्रसन्नता लाभते. त्याच प्रमाणे सगळीकडे आनंदी वातावरण निर्माण होते. आपले आरोग्य चांगले राहणे हे आपल्या शरीरावर आणि मनावरही अवलंबून असते केवळ शरीर निरोगी ठेऊन आपण संपुर्ण निरोगी होऊ शकत नाही त्यासाठी मन प्रसन्न, आनंदी असणे हे देखील आव्य्श्क असते. नवरात्रीतील नऊ विविध रंगामुळे आपले मन प्रसन्न होत असल्याने हे नवरंग आरोग्यदायी ठरतात. असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. या प्रत्येक रंगाचे एक वैशिष्ट्य असते जसे निळा रंग हा भव्यतेचे प्रतिक आहे. तर केशरी रंग हा वैभवाचे प्रतिक आहे. हिरवा रंग हा मनाला शांतता देणारा असतो तर पांढरा शुभ्र रंग हा स्वच्छता आणि शुचिता दर्शवितो. अशा प्रकारे या विविध रंगामुळे नवरात्रीच्या दिवसात आपले मन प्रसन्न होऊन निरोगी जीवनाकडे आपली वाटचाल सुरु होते.

Powered By Sangraha 9.0