रात्रीची झोप

17 Feb 2023 16:48:47

रात्रीची झोप

लेखद वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक)

मो. ९८२२०७५०२१

झोप हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. झोप ही एक आवश्यक शारीरिक क्रिया आहे. रात्रीची झोप ही आपल्या शरीराला दिवसभरातील मानसिक व शारीरिक श्रमांचा परिहार करण्यासाठी निसार्गानेच नेमून दिलेली योजना आहे. एखाद्या मोटारीचे इंजिन कार्यक्षम रहावे म्हणून एका ठराविक कालानंतर त्या इंजिनाला विश्रांती देणे गरजेचे असते, त्याचप्रमाणे आपले शरीर व मन हे कार्यक्षम राहण्यासाठी शरीरास मिळणारी झोप ही एक स्वाभाविक गरज आहे. आपल्या आरोग्याशी अगदी जवळून संबंधी असलेली झोप म्हणजे दिनचर्येतील अत्यंत महत्वाचा घटक आहे. रात्रीची झोप जर चांगली झाली तरच पुढचा दिवस चांगला जातो, अन्यथा काय होते ते आपणा सर्वानीच कधी ना कधी अनुभाव्लेलेच असणार.

आयुर्वेदाने झोप या घटकाला आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्व दिलेले आहे. पाछाक्ट्या वैद्य्कानेही हे महत्व नाकारले नाही.

या झोपेवर आपले सुख-दुख, शरीराचे बळ, पुष्टी, हे अवलंबून असतात, असे आयुर्वेद शास्त्र सांगते. आपल्या शरीराची एकूण ठेवणही (म्हणजे जाडबारीकपणा) बऱ्याच अंशी झोपेवर अवलंबून असतो. (अर्थात या ठेवणीवर आहाराचाही काही अंशी परिणाम होत असतो.) रात्री नेहमी जागरण करणारी मंडळी धष्टपुष्ट आढळतात. धष्टपुष्ट पणा व कृशता ही प्रकृतीवर देखील अवलंबून असते. पण झोप ही मात्र शरीराच्या ठेवणीवर परिणाम करणारी एक महत्वाची भूमिका बजावते हे निश्चित.

रात्री घेतलेली झोप स्वाभाविक झोप समजली जाते. झोपेला आहारा एवढेच महत्व आयुर्वेदाने दिलेले आहे. झोप हा आपल्या निरामय जीवाणाचा एक आधारस्तंभ आहे.

झोपेचे प्रमाण

रात्री स्वाभाविकपणे येणाऱ्या झोपेचे प्रमाण हे वयपरत्वे भिन्न असते. २० वर्षापासून ६० वर्ष वयाच्या व्यक्तींमध्ये साधारणपणे ६ ते ८ तास झोप ही आवश्यक अशी असते. यापेक्षा कमी किवा जास्त झोप ही अनारोग्यकार आहे. लहान मुलांमध्ये झोपेचे प्रमाण जास्त असते.

रात्रीचे जेवण आणि रात्रीची झोप यामध्ये किमान दीड-दोन तासांचे अंतर असावे. काही जणांना रात्री उशिरा ठेवून लगेच झोपायची सवय असते. अशी सवय आरोग्यास घटक असल्यास अशी सवय असणाऱ्यांनी ती त्वरित बंद करावी. जेवून लगेच झोपले असता पचन नीट होत नाही व अपचनाचे विकार उद्भवतात.

झोपताना योग्य तेवढी मोकळी हवा मिळेल, अशा पद्धतीची सोय असावी नेहमी पंख, कंडीशन अशा वातावरणात झोपण्याची सवयही चांगली नाही. कफाचे व्याधी असणारे अनेक रोगी रात्री पंख्याची सतत सवय असलेले आढळतात. दास चावू नयेत म्हणून कृत्रिम साधनांद्वारे डासांना आपल्याजवळ येऊ न देण्याच्या खातपीत अनेक जन स्वतःच्याही आरोग्याचे नुकसान करून घेतात. म्हणून डासांसाठी प्रतिबंधक कृत्रिम उपाय करण्याएवजी मच्छरदाणी हे साधन उत्तम समजावे.

झोपेमध्ये घोर्ण्याची सवय अनेकांना असते. ही गोष्ट शरीरात कुठेतरी बिघाड असल्याचे सूचित करते. तेव्हा नेहमी घोर्नार्यानी आपली संपूर्ण प्रकृती आपल्या वैद्यांकडून तपासून घ्यावी.

झोपेमध्ये दचकून जागे होणे, विचित्र स्वप्न पडणे, झोपेत बडबडणे, झोपेत उठून चालायला लागणे, अशा काही झोपेच्या संबंधातील तक्रारी अनेकांमध्ये आढळतात. त्यांचे नीट निवारण करून घ्यावे.

निद्रनाश :

झोप येत नाही किवा अंथरुणावर पडल्यापडल्या झोप लागत नाही, हे निद्रानाशाची तक्रार फार मोठ्या प्रमाणावर आढळून येते. कित्येकांना रात्री एखादे पुस्तक वाचल्याशिवाय झोपच लागत नाही.

निद्रानाशाने पछाडलेल्या व्यक्तींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. मानसिक अस्वस्थता, वाढीव कामाचा बोजा, मनावरील अद्पण, व्यावसायिक व्यवहारातील दडपणे, उच्च रक्तदाब अशा अनेक कारणांनी झोप न येणे अशी तक्रार घेऊन बरेच रोगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे येतात.

मनावरील दडपण कमी करण्यासाठी व झोप येण्यासाठी रात्री झोपेची गोळी घेऊन झोपण्याची नित्याची सवय अत्यंत घातक आहे. या बाबतीत स्वतः चे स्वतच उपचार करण्याकडे अनेकांची प्रवृत्ती आढळते. ती अतिशय वाईट आहे.

आयुर्वेद शास्त्राने या निद्रनाशावर बरेच उपाय सांगितले आहेत. अनेक आयुर्वेदीय वैद्य त्यांचा अवलंब यशस्वीपणे करतात. त्यातील काही उपाय निद्रानाशाची तक्रार असणाऱ्यांनी करून पहावेत.

झोपण्यापूर्वी डोक्याला व तळपायला तेल लावावे. हे तेल तिळाचे तेल, खोबरेल तेल असावे. झोपताना दूध व साखर घेण्यानेही फायदा होतो. अर्थात, कफ, खोकला दमा असे विकार असणाऱ्यांनी दूधासारखेच वापर शक्यतो टाळावा.

मेंदू शांत राहण्यासाठी मेंदूला बलदायक अशा काही वनस्पती आयुर्वेदाने सांगितल्या आहेत. या वनस्पतींची चुर्नेही निद्रानाशाच्या तक्रारींवर उपयोगी पडतात. त्यामध्ये ब्राम्ही, जटामांसी, सर्पगंधा, शान्ख्पुशी या वनस्पतींचा उल्लेख करता येईल अर्थात त्यांचा वापर वैद्यचे सल्ल्यानेच करावा. कारण त्या वनस्पतीचे प्रमाण हे वैद्यकीय सल्ल्याने ठरवावे लागते. निद्रनाशासाठी या नैसर्गिक उपायांखेरीज इतर कृत्रिम उपाय करणे हे धोकादायक असते व त्या कृत्रिम उपायांचे दूरगामी अनिष्ट परिणाम होतात, हे विसरून चालणार नाही.

झोप हा विषय अशा प्रकारे अतिशय महत्वाचा आहे. या विषयाबद्दल सतत जागरूक असणे आवश्यक आहे.



Powered By Sangraha 9.0